Ad will apear here
Next
‘प्रोमॅक्स अॅवॉर्ड्स’मध्ये ‘स्टार प्रवाह’चे रूपेरी यश
मुंबई : टेलिव्हिजन आणि जाहिरात क्षेत्रात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘प्रोमॅक्स अॅवॉर्ड्स’मध्ये ‘स्टार प्रवाह’ने बाजी मारली आहे. ‘विठूमाऊली’च्या बेस्ट मार्केटिंग कॅम्पेनसाठी रौप्यपदक आणि ‘शतदा प्रेम करावे’च्या बेस्ट प्रोमोसाठी रौप्यपदक हे दोन पुरस्कार ‘स्टार प्रवाह’ने पटकावले. या पुरस्कारांच्या निमित्ताने ‘प्रवाह’चा राष्ट्रीय स्तरावर सन्मान करण्यात आला.

‘विठूमाऊली’ मालिकेसाठी ‘स्टार प्रवाह’ची ‘बेस्ट नॅशनल इंटिग्रेटेड कॅम्पेन’ विभागात मराठीसह हिंदी आणि इंग्रजी चॅनेल्सबरोबर स्पर्धा होती; मात्र, त्यात स्टार प्रवाह वाहिनी सरस ठरली. विठ्ठल हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. त्यामुळे या मालिकेला घराघरात पोहोचवण्यासाठी टीव्ही, वृत्तपत्र, रेडिओ, सोशल मिडीया अशा नेहमीच्या माध्यमांसह कीर्तन आणि वासुदेव या लोककला, ऑगमेंटेड रिअॅलिटी या माध्यमांचाही वापर करण्यात आला होता. ऑगमेंटेड रिअॅलिटी, कीर्तन आणि वासुदेव या लोककलांचा केलेला वापर हेच ‘विठूमाऊली’च्या कॅम्पेनचे वेगळेपण ठरले आणि राष्ट्रीय स्तरावर सिल्व्हर अॅवॉर्ड मिळाले. या पुरस्काराच्या निमित्ताने ‘स्टार प्रवाह’च्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेलाय.

‘शतदा प्रेम करावे’च्या प्रोमो कॅम्पेनची स्पर्धा हिंदी आणि इंग्रजी चॅनेल्स वगळता इतर प्रादेशिक चॅनेलबरोबर होती. त्यात ‘शतदा प्रेम करावे’ला सिल्व्हर अॅवॉर्ड मिळाले. या कॅम्पेनसाठी टीव्ही, सोशल मिडीया अशा माध्यमांचा वापर करण्यात आला होता. ‘विठूमाऊली’ आणि ‘शतदा प्रेम करावे’ या दोन्ही मालिकांना महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZKIBO
Similar Posts
‘शतदा प्रेम करावे’मध्ये रंगणार महानाट्य मुंबई : ‘स्टार प्रवाह’च्या ‘शतदा प्रेम करावे’ या मालिकेने एक वेगळे वळण घेतले आहे. सायली आणि उन्मेषच्या नात्यात रोहनच्या रूपाने एक अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे सायली आणि रोहनचे होणारे लग्न उन्मेष थांबवू शकेल, का याची उत्सुकता निर्माण झाली आहे. या मालिकेचा महाएपिसोड रविवारी (ता. १७) दुपारी एक आणि सायंकाळी सात वाजता दाखवला जाणार आहे
‘विठूमाऊली’ टीमची पावसाळी सहल उत्साहात मुंबई : एखाद्या दिवशी अचानक सुट्टी मिळावी आणि सहजच एखादा सहलीचा प्लॅन ठरावा असे फार क्वचित घडते; मात्र, हे जेव्हा घडते तेव्हा ती सहल कायमच लक्षात राहते. ‘स्टार प्रवाह’वरील ‘विठूमाऊली’ मालिकेच्या टीमला अशीच एक धम्माल सहल करण्याची संधी नुकतीच मिळाली. सुट्टी मिळताच ‘विठूमाऊली’च्या टीमने थेट भंडारदरा गाठले आणि वर्षा सहलीचा आनंद घेतला
‘विठूमाऊली’तून उलगडणार वारीचा इतिहास मुंबई : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम यांच्या पालख्यांची पंढरीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. ज्ञानोबा-तुकोबा आणि विठूनामाचा गजर करत वैष्णव तल्लीन होऊन रिंगण करत, मुक्काम करत पायी पंढरपूरला आषाढीला भेटणार आहेत. वारीचा हाच सगळा प्रवास ‘स्टार प्रवाह’च्या ‘विठूमाऊली’ या मालिकेतून उलगडणार आहे
‘शतदा प्रेम करावे’मध्ये ज्ञानदा रामतीर्थकर मुंबई : स्टार प्रवाहच्या ‘शतदा प्रेम करावे’ या लोकप्रिय मालिकेत एक ट्विस्ट आला आहे. या मालिकेतल्या सायली या भूमिकेत स्नेहा शहाच्याऐवजी ज्ञानदा रामतीर्थकर ही अभिनेत्री दिसणार आहे. अल्लड, अवखळ असलेली सायली ही भूमिका ज्ञानदा कशी साकारणार हे पहावे लागेल.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language